Posts

Showing posts from March, 2018

जीवन समाधान असमाधान ..एक गवसणी

Image
आपल्या कडे सुख आणि दुःख भरपूर असते पण समाधानाची तेवढी कमतरता असते ...सुख दुःख आपोआप आपल्या आयुष्यात घर करून जातात ..समाधानाला पूर्व परवाना लागतो..आणि आपला संशयी स्वभाव ...या समाधानाला काय लवकर विश्वासात घेत नाही...कारण समाधानाला जवळ केलं तर भविष्यातील ऐश्वर्य रुसेल अशी अनाहूत भीती वाटायला लागते मनुष्य देहाला ...शेवटी एकामागून एक अनुभव घेत घेत पुढे जाऊन हाच मनुष्य अलगद त्याच्याही नकळत समाधानाला आपलंसं करून घेतो ...म्हणूनच उतार वयात त्याला आयुष्याचं खर गणित उमजत ...मग तो आपल्या मुलाला योग्य मार्गावर येण्यासाठी प्रवृत्त करू लागतो...पण आज काल मुलगा बापाला त्यांचेच तरुणपणीचे दाखले देऊन गप बसवतो ...बापाचीही चूक मान्य होत नाही...परत त्या असमाधानाला गवसणी घालतो.. जीवन समाधान असमाधान ..एक गवसणी

प्रेम प्रकरण...

Image
प्रिय.. प्रेम विवाहाच जरा अवघडच गणित असतं. आयुष्याच्या मध्यांतराचा काळ एकीकडे सुरुवातीपासून मिळालेलं प्रेम आणि दुसरीकडे शेवटपर्यंत मिळणारं प्रेम.... यातून कोणा एकाचा त्याग हि महाकठीण गोष्ट ...आणि एखाद्या बाजूचा रुष्ट पणा हि सहनशीलतेची पूर्ण परीक्षा घेणारा ...शेवटी विचाराच्या गुंत्यात अडकून जाऊन ....आपल्या मनाचा चंचल पणा आणि शेवटी सगळे एकत्र येतील अशी भोळी भाबडी आशा ...पण संपूर्ण जीवनातली शेवटची भेट प्रियकाराशी अथवा जन्मदात्याची अशीही एक अनामिक भीती ...शेवटी उत्तराच्या अपेक्षेत घेतली जाणारे निर्णय ..या निर्णयातून तयार होणारे रुसवे फुगवे टोमणे या सगळ्यांना तोंड देताना येणाऱ्या असंख्य अडचणी..आणि आपली पावले किती बरोबर आहेत याची उलट परिक्षा घेणारं आपलं मन...समोरच्याच्या डोळ्यातील प्रेम बघून .... त्याच मनाची एक प्रकारची शांती करने... या सगळ्या विळख्यातून सुटून एकमेकांमध्ये निर्विवाद एकरूप होणं ...आपल्या सर्व अवगुणांसोबत... प्रेमविवाह .