जीवन समाधान असमाधान ..एक गवसणी

आपल्या कडे सुख आणि दुःख भरपूर असते पण समाधानाची तेवढी कमतरता असते ...सुख दुःख आपोआप आपल्या आयुष्यात घर करून जातात ..समाधानाला पूर्व परवाना लागतो..आणि आपला संशयी स्वभाव ...या समाधानाला काय लवकर विश्वासात घेत नाही...कारण समाधानाला जवळ केलं तर भविष्यातील ऐश्वर्य रुसेल अशी अनाहूत भीती वाटायला लागते मनुष्य देहाला ...शेवटी एकामागून एक अनुभव घेत घेत पुढे जाऊन हाच मनुष्य अलगद त्याच्याही नकळत समाधानाला आपलंसं करून घेतो ...म्हणूनच उतार वयात त्याला आयुष्याचं खर गणित उमजत ...मग तो आपल्या मुलाला योग्य मार्गावर येण्यासाठी प्रवृत्त करू लागतो...पण आज काल मुलगा बापाला त्यांचेच तरुणपणीचे दाखले देऊन गप बसवतो ...बापाचीही चूक मान्य होत नाही...परत त्या असमाधानाला गवसणी घालतो..
जीवन समाधान असमाधान ..एक गवसणी