प्रेम प्रकरण...


प्रिय..
प्रेम विवाहाच जरा अवघडच गणित असतं. आयुष्याच्या मध्यांतराचा काळ एकीकडे सुरुवातीपासून मिळालेलं प्रेम आणि दुसरीकडे शेवटपर्यंत मिळणारं प्रेम....
यातून कोणा एकाचा त्याग हि महाकठीण गोष्ट ...आणि एखाद्या बाजूचा रुष्ट पणा हि सहनशीलतेची पूर्ण परीक्षा घेणारा ...शेवटी विचाराच्या गुंत्यात अडकून जाऊन ....आपल्या मनाचा चंचल पणा आणि शेवटी सगळे एकत्र येतील अशी भोळी भाबडी आशा ...पण संपूर्ण जीवनातली शेवटची भेट प्रियकाराशी अथवा जन्मदात्याची अशीही एक अनामिक भीती ...शेवटी उत्तराच्या अपेक्षेत घेतली जाणारे निर्णय ..या निर्णयातून तयार होणारे रुसवे फुगवे टोमणे या सगळ्यांना तोंड देताना येणाऱ्या असंख्य अडचणी..आणि आपली पावले किती बरोबर आहेत याची उलट परिक्षा घेणारं आपलं मन...समोरच्याच्या डोळ्यातील प्रेम बघून .... त्याच मनाची एक प्रकारची शांती करने... या सगळ्या विळख्यातून सुटून एकमेकांमध्ये निर्विवाद एकरूप होणं ...आपल्या सर्व अवगुणांसोबत...