सोबती...च्या शोधातले आपण

कोणाच्यातरी फक्त असण्याने आपलं जीवन जरा बहरून आल्यासारखं होतं... तो असला की न आवडणाऱ्या गोष्टीही आपण सहज करायला लागतो..त्याचा तो सहवास त्या वेळी जरा जास्तच वर्चस्व प्रस्थापित करतो आपल्या वर...त्याने आपला वापर करण आपल्याला कधीच पसंत पडणारं तर नसतंच पण नकळत आपणही त्याचा वापरच करून घेतोय हे आपण टाळत असतो...
शेवटी कुठलही सख्या व्यतिरिक्त नातं हे आपण स्वीकारतो..आणि गरज पडेल तेव्हा नाकारतोही...मग काही वेळ त्याच्या आठवणीत...मग परत कोणीतरी येतो आयुष्यात..दस्तक देतो...पुन्हा नव्याने डाव मांडला जातो...हे क्रमाक्रमाने चालूच राहतं... त्यातून आपली ती निवड असते कोणाला स्वीकारायचं आणि कोणाला नाकारायचं.... त्याची आधीच्या लोकांशी comparison करत बसलात तर तुम्ही मेलात असं समजा ...कोणतीही व्यक्ती एकसारखी नसतेच हवतर तुम्ही सर्वांना एक वेगवेगळ स्थान आयुष्यात देऊ शकता काय हरकत आहे ...तेवढ्यापेक्षा जास्त त्याचं आणि आपलं आयुष्य खूप वेगवेगळं असत...
एकाच माणसात जर सगळं शोधलं तर ...निराश नक्कीच व्हाल..पण वेगवेगळ्या माणसांमध्ये थोडं थोडं शोधलं आणि तेवढ्यापुरतच त्यांचं आणि आपलं relation ठेवलं तर आयुष्यात काहीच अवघड नाही ...अर्थात जोपर्यंत आपल्याला आपली संगत जोपर्यंत रुचत नाही तोपर्यंत माणूस एकटा राहायला घाबरतो....जीवनातलं जर खरं सत्य तुम्ही मला विचारलं तर मी अस्खलित पणे सांगेन कि तुमच्या स्वतः पेक्षा आयुष्यात कोणीच तुमच्यासाठी perfect सोबती नाही....
नेहमी आपण बरोबर असावं असं नाही..पण नालायकांच्या विळख्यात असणं चूकच ...