साहजिक

कोणीतरी आपल्याला गृहीत धरतय यातही प्रेम असतं...

नेहमी आपलं नातं कसं दर्शनीय असावं या गुंतागुंतीत आपण अडकलेले असतो...

.. आणि तेही स्वाभाविकच हो पण जसा आई आधी आपल्या मुलाचाच विचार करते तसा आपणही आपलाच विचार करा ना.....

.. नातं असलं की दाखवण्याची गरज उरत नाही आणि.... तेवढं ते खोल नसेल तर संवाद कौशल्याची प्रतिभा......

.. काही लोक मात्र कृतीतूनच लोकांना प्रभावित करतात

...आयुष्यात कधीही न भेटलेल्या माणसाबद्दल जेव्हा लोक चांगले बोलायला लागतात तेव्हा त्यांची कृती त्याच्यात भिनलेली असते.