थोडक्यात सर्वकाही जगण्याचं साधेपणा

लहान मुल दिसलं कि त्याच्यात गुंतून जाण्याचा मोह अनावर होतो

मागे पाहू नकोस म्हणलं कि मागून कोणीतरी येतंय कि काय अशी अनामिकता मनात येते

समाधानी चेहऱ्यावरचं स्मित  फार काळ लपून राहत नाही

प्रेमा साठी अगदी कोणत्याही व्यक्तीची आपल्याला आवश्यकता नसते फक्त आपण एक खरे व्यक्ती असावे लागतो

जीवनात आधार शोधात बसणारे खूप लोक भेटतात पण आधार देणारे खूप कमी असतात

प्रेमाचे लोक दिलखुलास पने नाही व्यक्त झाले तर त्रास होतो

उमेदीच्या काळात जग जिंकलेला माणूस उतारवयात अगदी हतबल झालेला बघताना जीवाला वेदना होतात

लहानपणा पासून कौटुंबिक वातावरणात राहिलेले मुलं जेव्हा अचानक कुटुंबापासून दूर जातात तेव्हा खऱ्या भावना व्यक्त करायला सुरुवात होते

काही गोष्टी व्यक्त कराव्याच लागतात समोरचा प्रत्येक वेळी समजून घेणारा असला तरी

नात्याचा उपयोग नसतो उपभोग असतो

एखाद्यावर प्रचंड प्रेम करणे; पण कृतीतून खूप happpening असते.

कधी कधी एखादी उपमा देऊन सुद्धा समोरच्याचा राग थंड करता येतो अर्थात राग वाढवण्यासाठी हा उत्तम पर्याय आहेच

आयुष्यात वेगवेगळी माणसं सतत भेटत राहण्यात एक वेगळाच नावीन्य असत

बदलाला आयुष्यात सामावून घेण्यासाठी वेळ लागतो पण आपल्याला त्याच्यात सामावून जायला वेळ लागताच नाही

प्रेम सांगण्याची ऐकायची काहीच गरज नाही लहान मुलाला सुद्धा कळत ते खरं ते सगळ्यांकडे आहेच

समोर असणाऱ्या मैत्रिणीमध्ये आपल्याला एखादी जेव्हा आवडते तेव्हा मन जसे प्रफुल्लित होते तसे परत कधी झाल्याचे आठवत नाही,

प्रेम शोधायचं म्हणलं तर काहीच कष्ट लागत नाही द्वेषासाठी किती वेळ लागेल

आई सोबत वागण्याचा उत्तम पर्याय म्हणजे नेहमी जे योग्य आहे तेच करणं तिलाही तेच हवं असत

दोन प्रेमाच्या माणसाचे भांडण सोडवण्यासाठी मध्यस्ती नाही लागत

अजूनही लोक प्रेम करतात व्यक्त करण्याची पद्धत बदलली आहे

डायरेक्ट समोरासमोर आपल्या प्रेमाची कबुली देण्याइतक थ्रील कशात आहे

आपण उगाच एखाद्याबद्दल विचार करत असतो ते जर लिहून ठेवले तर एक नवीन विश्व उभं राहू शकते